Home चंद्रपुर जिल्हा विशेष परभणी घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाही तहसीलदारांना निवेदन

परभणी घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाही तहसीलदारांना निवेदन

1309

घटनेतील मास्टरमाईंड यांना तात्काळ शोधून कारवाही करण्याची संविधान प्रेमींची मागणी

सिंदेवाही : भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान असून परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यातील बाबासाहेबांच्या हातात असलेल्या संविधानाची एका अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याने संविधान प्रेमींनी सदर घटनेचा निषेध करीत आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करीत परभणी येथील जनता रस्त्यावर उतरली असता, शासन आणि पोलीस प्रशासन यांनी नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून नागरिकांवर अमानुष लाठीचार्ज केला. त्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आणि घटनेमागील मास्टरमाईंड असलेला हात तात्काळ शोधून त्यांचेवर कारवाही करण्याची मागणी करीत सिंदेवाही येथील आंबेडकरी जनता तथा संविधान प्रेमींनी तहसीलदार संदीप पानमंद यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.

.     भारतीय संविधान हे सार्वभौम , समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. भारतीय संविधान हे नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य, आणि बंधुताला चालना देण्याचे काम करते. अशा या महान भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून येथील प्रस्थापितांना हे मान्य नसल्याने या ना त्या मार्गाने भारतीय संविधानाचा अपमान करून राज्यात अराजकता माजविण्याचे काम प्रस्थापितांकडून केल्या जात आहे. नुकताच परभणी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याच्या हातात असलेल्या संविधानाची एका समाजकंटकाकडून तोडफोड केल्या गेली. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत तेथील आंबेडकरी जनता, आणि संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले असता, शासन – प्रशासनाकडून आंबेडकरी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून नागरिकांवर अमानुष लाठीचार्ज केला. निरपराध नागरिकांना मारहाण करून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.

.       या घटनेचा निषेध व्यक्त करीत आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या व्यक्तीला शोधून तात्काळ कारवाही करण्यात यावी. याकरिता सिंदेवाही येथील आंबेडकरी जनता, तथा संविधान प्रेमी यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भोजराज सोरदे, नंदू कानुजी खोब्रागडे सूर्यजीत खोब्रागडे, श्रावण नागदेवते, विकास गेडाम, तेजस डोंगरे, नंदू खोब्रागडे, रेवानंद बंबोळे, सुशिम नागदेवते, निलेश मेश्राम, शांताबाई पाझारे, शुभांगी खोब्रागडे, रंजना चुनारकार, संगीता खोब्रागडे, नलिनी रामटेके, ममता रामटेके, पुष्पा साखरे, प्रज्ञा मेश्राम, दर्शना खोब्रागडे, इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!