Home चंद्रपुर जिल्हा विशेष लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रेलरची समोरासमोर धडक

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रेलरची समोरासमोर धडक

1291

कोठारी जवळील घटना

एक ठार : एक गंभीर

दोन तास वाहतूक खोळंबली

कोठारी : सुरजागड येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एका वाहनाचा चालक जागीच ठार झाला तर दुसऱ्या वाहनाचा चालक गंभीर झाल्याची घटना कोठारी नजीक अडेझरी वळणावर घडली. या भीषण अपघातमुळे दोन तास वाहतूक खोळंबली होती. सदर घटना गुरुवार सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.

.       पोलिस सूत्रानुसार बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावापासून तीन किमी अंतरावर अडेझरी वळणावर सुरजागड लोह खनिज मालवाहू ट्रक आणि कोठारीकडून सुरजागड येथे जाणाऱ्या ट्रेलरचा भीषण अपघात गुरुवार सकाळी ९ वाजताच्या दरम्यान झाला. या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रक व ट्रेलर चे मोठे नुकसान झाले आहे. तर एक वाहनातील चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, अपघातात दोन्ही मोठ्या वाहनांचा चुरंडा झाल्याचे दिसून येते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामधील गंभीर जखमींना उपचारासाठी कोठारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

.        गेल्या काही दिवसापासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. रस्ते अपघातात वाहनाची गती आणि ओव्हरटेकमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे खराब व अरुंद रस्त्यामुळेही अपघाताच्या घटना घडत आहेत.

error: Content is protected !!