Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतकऱ्याचे विहिरीवरील ऑइल इंजिन गेले चोरीला

शेतकऱ्याचे विहिरीवरील ऑइल इंजिन गेले चोरीला

1317

भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढले

पोलिसांसमोर आव्हान

विहीरगाव येथील घटना 

नेरी : चिमूर तालुक्यातील विहीरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचे शेता मधील मोटारपंप, डिझेल इंजिन चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. विहीरगाव येथील शेतकरी नंदकिशोर रुपचंद रामटेके यांच्या शेतातील सर्वे क्र 255 मधील विहिरीवर असलेले कॉमेंट कंपनीचे ऑइल इंजिन सेक्शन पाईपसह अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्याची घटना घडली.

.      विहीरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवर ऑइल इंजिन, काहीं ठिकाणी मोटार बसविल्या आहेत .रब्बी पिकाचा पेरणी करून दिवसभर शेतीचे कामे करून थकलेले शेतकरी रात्रौ घरी विश्रांती साठी झोपी गेले असताना हिच संधी साधून भुरट्या चोराणी शेतातील साहित्य चोरून नेले आहेत.

.     अगदी बस स्टॉप पासून लागून असलेल्या शेतीमधील इंजिन व सेक्शन पाईप चोरट्याच्या टोळीनी चोरून नेले असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पूर्वी याच परिसरात धानाची डिबली जाळण्यात आली होती. सदर विषयाची तक्रार पोलीस स्टेशन चिमूर ला करण्यात आली असून या तक्रारीची दखल घेऊन भुरट्या चोरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी रुपचंद रामटेके सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!