भद्रावती : वर्धा येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटामध्ये येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाची आरुषी मंगेश बेतवार विभागस्तरावर विजयी झाली असून, ती आता अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
. विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लोकमान्य विद्यालयाच्या आरुषीने सर्वप्रथम वर्धा जिल्हा त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील खेळाडूंवर विजय मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आपले स्थान पक्के करून भद्रावतीच्या तसेच लोकमान्य विद्यालयाच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला.
. आरुषीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, रवींद्र नंदनवार व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आरुषीने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षिका लता इंदूरकर यांच्यासह आपल्या पालकांना दिले आहे.


