Home राजकीय बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास केला – सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास केला – सुधीर मुनगंटीवार

1276

विसापूर येथे पार पडली प्रचार सभा

बल्लारपूर : आपल्या मत रुपी प्रेमाचा आशिर्वाद मला मिळाला. त्यावेळी पहिल्यांदा गावात १ कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले. तेव्हापासून अविरतपणे विकास करत आहे. हे कार्य करत असताना जातीपातीचा विचार केला नाही. माझ्या विकासाची गाथा मोठी आहे. हाच मताचा आशिर्वाद या विधानसभा निवडणुकीत कायम राहू द्या. लोकसभा निवडणुकीत जी चूक केली. त्याची पुनरावृत्ती करू नका. मी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी विसापूर येथील प्रचार सभेत बुधवारी केले.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सार्वजनिक मंचावर भाजपाच्या विसापूर शाखेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते मतदारांशी संवाद साधत होते. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या पाच वर्षात सुरूवातीचे २ वर्ष ८ महिने महाविकास आघाडीचे राज्यात सरकार होते. त्यावेळीच्या पालकमंत्र्यांनी काय काम केले, ते सांगावे. कांग्रेसवाले केवळ दिशाभूल करणारे आहे. विसापूर गावाच्या आजुबाजुला नजर टाकला, तर ठिकठिकाणी तुम्हाला विकास दिसून आल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आरोग्य शिबीर, नेत्र चिकीत्सा तपासणी शिबिराचे आयोजन केले. गरजूंना शस्त्रक्रियेसाठी मदत केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा म्हणून ठिकठिकाणी हात पंप दिले.

.      लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे आयाबहिणींना मदत होत असल्याचे समाधान मिळत असले, तर कांग्रेसवाल्यांच्या पोटात दुखतंय. महायुतीचे सरकार राज्यात आल्यावर १ हजार ५00 रुपये ऐवजी २ हजार १00 रुपये दर महिन्याला देण्याचे वचन देतो आहे,असे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले. बेरोजगारीचा प्रश्न कमी करण्यासाठी पोंभुर्णा तालुक्यात ४0 हजार कोटी रुपये खर्चाचा कारखाना उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.      यावेळी मंचावर भाजपाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, शाखा अध्यक्ष गणेश टोंगे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा चिटणीस विद्या देवाळकर, संदीप पोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंजली पंदीलवार, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा इटनकर, माजी सरपंच भारत जीवने, शशिकला जीवने, अर्चना पोतराजे, माजी पंचायत समितीच्या सदस्य विद्या गेडाम, अशोक थेरे आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!