Home चंद्रपुर जिल्हा विशेष 6 जिवंत काडतुसासह एकाला अटक

6 जिवंत काडतुसासह एकाला अटक

1328

शहर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी बाबुपेठ येथे रविवारी (दि. 10) ला पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे कुणाल मनिष कातकर (30) रा. बाबुपेठ यांच्या घराची झडती दरम्यान त्यांच्याकडून 6 जिवंत काडतुस पितळी धातुची बुलेट (90 एम एम केएफ) अंदाजे 6 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. कुणाल कातकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला.

.      चंद्रपूर जिल्हयामध्ये विधानसभा निवडणुक आदर्श आचारसहिता लागु झालेली असुन आचारसहिते दरम्यान पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा घालणेकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरीता पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंद्रपुर शहरामध्ये पेट्रोलींग करीत असता गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, कुणाल मनीष कातकर वय ३० वर्ष रा. बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर याचे राहते घरी अवैध्य प्राणघातक दारूगोळा (बुलेट) असल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्याने सदर इसमाचे राहते घरी जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे घर झडती दरम्यान दारूगोळा एकुण ०६ जिवंत पितळी धातुची बुलेट (9 MM KF) कि.अं. ६,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.

.      सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधीकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरके पोलीस ठाणे चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि निलेश वाघमारे, पोउपनि संदीप बच्छिरे, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, संतोष कावळे, शाहाबाज सय्यद, विक्रम मेश्राम, राजेश चिताडे, इम्रान खॉन, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, इरशाद शेख, सतोष राठोड, भावना रामटेके यांनी केली आहे.

error: Content is protected !!