Home चंद्रपुर जिल्हा विशेष मरनानंतरचीही वाट बिकटच

मरनानंतरचीही वाट बिकटच

1299

दोन वर्षांत पाच गावांना स्मशानशेड

सुधाकर दुधे

  सावली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही स्मशानभूमी उभारलेल्या नाहीत, जेथे आहेत तेथे अनेक गैरसोयी असल्याने मृतदेहांची तर हेळसांड होतेच शिवाय सग्यासोयऱ्यांनाही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. काही गावांत जागे अभावी स्मशानशेड उभारले गेले नाही अशा ठिकाणी अनेकदा शेताच्या बांधावरच अंत्यसंस्कार केले जातात, हे चित्र सावली तालुक्यातील अनेक गावांत आजही पाहायला मिळते. त्यामुळे येथे मरणानंतरचीही वाट बिकटच आहे.

.      तालुक्यात आजही ११० गावांपैकी केवळ ३० टक्के गावांत स्मशानशेड आणि स्मशानभूमीची सोय आहे. उर्वरित ७० टक्के गावात मरणानंतरची वाट बिकट झाली आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसातून रस्त्याअभावी मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे जाताना जित्यांना मरण यातना सोसाव्या लागतात. तसेच रस्ता स्मशानभूमी व स्मशान शेड अनेक गावांमध्ये नसल्याने अंत्यविधी आहे. कसा करावा, या विवंचनेत शोकाकुल कुटुंबाला चितेची चिंता पडते. अनेक गावांमध्ये देखभालीअभावी स्मशान शेड मोडकळीस आली आहेत. स्मशानशेडकडे जाणारे रस्ते नाहीत.

.      पाण्यातून वाट काढत जाताना मृतदेह नेताना संघर्ष करावा लागतो. हजारो लोकसंख्या असलेल्या गावांमध्येही अशीच परिस्थिती आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या सावली शहरात पावसाळ्यात चिखल पाण्यातून तसेच रस्त्यावर वाढत असलेले अतिक्रमणं आहे त्यामुळे कमी जागेतून वाट काढत अंत्ययात्रा जाते, तर जागेअभावी अनेक गावांतून स्मशान शेडची कामे रखडली आहेत. अनेक गावांतून जागांचा मोठा वाद आहे.

.      अनेक गावांमध्ये स्मशानशेड प्रकरणावरून अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. काही गावात स्मशानभूमी जागेजवड शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमणं करीत आहे बहुतांश गावामध्ये स्मशान शेड वा स्मशानभूमी नसल्याने अनेक गावातील नागरिक आपल्या खाजगी जमिनीत प्रेताला अग्नी देतात मात्र ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यापुढे गंभीर प्रश्न उभा राहतो. बहुतांश गावात स्मशान शेड उपलब्ध असेल तरी पावसाळ्यात गळती होत आहे तर अनेक स्माशांशेड पर्यंत जाण्यासाठी रस्तेच नाही.

.      जिथे रस्ते आहेत त्याठिकाणी पाणी व चिखलातून जावे लागत असल्याने जिवंतपणीच मरणाच्या वाटा शोधत असल्याचे बोलले जात असते एकंदरीत तालुक्यात स्मशानभूमीची प्रचंड दुरवस्था झाली असून पावसाळ्यात मृतदेहाची प्रश्न हेळसांड होत आहे. स्मशान शेड व स्मशानभूमीची सुधारणेसाठी शासन निधी देत असते काही ग्रामपंचायतीकडे स्मशान शेड साठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे स्मशान शेड झालेले नाही स्मशान शेड बरोबरच रस्त्याची व्यवस्था करणेही गरजेचे आहे तालुक्यातील बहुतांश गावात स्मशान शेड उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

दोन वर्षांत केवळ पाच गावांना निधी                                                                                                                                               2021-22 या वर्षात पाथरी, पालेबारसा, उसरपार तुकुम व 2022-23 मध्ये खेडी व कवठी असे एकूण पाच गावांना दोन वर्षात निधी मिळाल्याची माहिती आहे.                                                                                                                                               जंगल व्याप्त गावात स्मशानभूमी ची राखीव जागाच नाही त्यामुळे स्मशान शेड नाहीत परिणामी बहुतांश गावातील कुटुंब प्रेत नदिघाट लगतच अंत्यसंस्कार करीत असतात त्यामुळे अनेक मूलभूत बाबीचा त्रास सहन करावा लागत आहे.                                                                                                                                            जितेश सोनटक्के,                                                                     उपसरपंच,                                                                       ग्रामपंचायत डोनाळा

error: Content is protected !!