Home चंद्रपुर जिल्हा विशेष वाहनातून 75 लाखांची रोकड जप्त

वाहनातून 75 लाखांची रोकड जप्त

1317

माढेळी नाका चेकपोस्ट वर वरोरा एसएसटी पथकाची कारवाई

वरोरा : माढेळी नाका चेकपोस्ट वर एका चारचाकी वाहनाची एसएसटी पथकाने झडती घेतली दरम्यात त्या वाहनात तब्बल 75 लाख रुपयाची रोकड दिसून आली असून 75 लाख रोख रक्कम सह वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मंगळवारी (दि. २९) दुपारी १ वाजताच्या सुमारास केली. घटनेनंतर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी उपकोषागार कार्यालयात भेट देऊन पाहणी केली.

.      प्राप्त माहितीनुसार सदर रक्कम आशापुरी अॅग्रो इंडस्ट्रिज माढेळीची आहे. माढेळी येथील आशापुरी अॅग्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक संजय शर्मा यांनी मंगळवारी दुपारी वरोरा येथील बँकेतून ७५ लाख रुपये काढले. ही रकम एमएच ३४ बीएफ ९२६१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने घेऊन माढेळी येथे जाण्यासाठी निघाले. दुपारी १ वाजताच्या दरम्यान माढेळी चेकपोस्ट वरील निवडणूक विभागाच्या एसएलटी पथकाने वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात ७५ लाख रुपयांची रोकड आढळून आली.

.      यानंतर या पथकाने ७५ लाख रुपये आणि वाहन जप्त करीत उप कोषागार कार्यालय वरोरा येथे आणले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी गजानन मुंडकर यांनी केली.

.      या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी उप कोषागार कार्यालय वरोरा येथे भेट देऊन पाहणी केली. आयकर विभागाचे अधिकारीसुद्धा वरोरा येथे दाखल झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी रकम जप्त केली. जप्त केलेल्या रकमेसंबंधीची कागदपत्रे तपासणीचे काम सुरू आहे.

.      ७५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाचे अधिकारी पुढील तपासणी करीत आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर रकम व्यापाऱ्याला परत दिली जाईल. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अले नोडल अधिकारी गजानन मुंडकर यांनी सांगितले. ही रकम काढण्यासाठी जाताना चेकपोस्टवरील एसएसटी पथकाला याबाबतची माहिती दिली. यानंतरही ही कारवाई करण्यात आल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!