Home चंद्रपुर जिल्हा विशेष जिल्हात सहा जागेवर भाजप – काँग्रेस ची लढत

जिल्हात सहा जागेवर भाजप – काँग्रेस ची लढत

1324

जागा वाटपाचा तिढा सुटला

चंद्रपूर : जिल्हातील काही जागा वाटपा संदर्भात सुरु असलेला तिढा सुटला. चंद्रपूर जिल्हात आता सहा ही जागांवर भाजप आणि काँग्रेस ची समोरासमोर लढत होणार आहे. मात्र इच्छुक असलेले उमेदवाराना संधी मिळाली नसल्याने वरोरा विधानसभा क्षेत्रात मात्र बंडखोरी होण्याचे संकेत आहे.

.       मध्यमहाविकास आघाडीत उबाठा आणि काँग्रेस मध्ये वरोरा मतदार संघांत जागा वाटपासाठी तिढा सुरु होता तर काँग्रेस मध्ये वड्डेटीवार गट दावा करत असल्याने जागे साठी संघर्ष सुरु होता. अखेर खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना रविवारी रात्री अधिकृत उमेदवारी घोषित झाली. असे असले तरी प्रवीण काकडे यांनी काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी च नामांकन अर्ज दाखल केला होता. तर काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चंद्रपूरसाठी प्रवीण पडवेकर, तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी संतोष रावत यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना यावेळी विधानसभा क्षेत्रात पहायला मिळणार आहे.

सुधीर मुनगंटीवार, वड्डेटीवार आज नामांकन अर्ज दाखल करणार                                                                                                                                                                                             29 ऑक्टोबर हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी राहणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ये मूल येथे नामांकन अर्ज दाखल करणार आहे तर राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार हे ब्रम्हपुरी येथे अर्ज दाखल करणार आहे. वरोरा मतदार संघातून शिवसेना उबाठा चे मुकेश जिवतोडे, प्रहार संघटने कडून अहतेशाम अली आज वरोरा येथे नामांकन अर्ज दाखल करणार आहे. सर्वच उमेदवारांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

error: Content is protected !!