Home सामाजिक वाढदिवसानिमित्य अनाथ मुलीच्या नावाने 5 हजार रुपयाची मुदत ठेव 

वाढदिवसानिमित्य अनाथ मुलीच्या नावाने 5 हजार रुपयाची मुदत ठेव

1312

सरोज चौधरी बनले अनाथांचा नाथ

नेरी : आधार नागरी सहकारी पत संस्था मर्यादित चिमूर चे अध्यक्ष सरोज चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर येथून जवळच असल्येल्या मासळ (बु) येथील एका अनाथ मुलीच्या नावाने ५ हजार रुपयाची रक्कम फिक्स करून दिली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने ते अनाथांचा नाथ बनले.

.        चिमूर तालुक्यातील अल्पावधीत नावारूपास आलेल्या आधार नागरी पतसंस्थेचे अध्यक्षांनी आपल्या निवडक सहकाऱ्यानिशी मासळ (बु) येथे जाऊन अनाथ मुलीचे सोबत अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी तिला ५ हजाराचा धनादेश देऊन त्या रकमेची एफ डी करून दिली. व सोबत अनाथासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती तिच्या आजीला समजावून दिली.

.        या प्रसंगी सुशील नन्नावरे, गुणवंत वाघमारे, संदीप धारणे, केशव गजभे, आकाश चौधरी, आदी संचालक मंडळी तथा आधार संस्थेचे व्यवस्थापक सुशांत नन्नावरे, अभिकर्ता वाघमारे तथा नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!