Home चंद्रपुर जिल्हा विशेष मेडिकल स्टोअर मध्ये काम करणार्‍या युवतीचा विनयभंग

मेडिकल स्टोअर मध्ये काम करणार्‍या युवतीचा विनयभंग

1330

वरोरा शहरातील घटना

वरोरा : शहरातील आंबेडकर चौकात असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये काम करणार्‍या वीस वर्षीय युवतीचा तिथेच काम करणार्‍या 40 वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना दि. 23 ओक्टोंबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. छोटू उर्फ रामु ऋषी गाडगे (40) रा. वरोरा असे आरोपीचे नाव आहे. वरोरा शहरात पुन्हा एक विनयभंगाची घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.

.      प्राप्त माहितीनुसार वरोरा शहरातील आंबेडकर चौकात गोठी मेडिकल आहे. या मेडिकल मध्ये अनेक वर्षापासून छोटू उर्फ रामु गाडगे काम करत आहे. तर त्याच मेडिकल स्टोअर मध्ये औषधीचे वितरण करण्याचे काम एक 20 वर्षीय युवती करत आहे. दि. 23 ओक्टोंबर रोजी त्या युवतीला  औषधाचे बॉक्स काढण्यासाठी लागूनच असलेल्या  स्टोअर रूम पाठवण्यात आले. ती औषधीचा बॉक्स आणण्यासाठी गेली असता तिच्या पाठोपाठ छोटू गेला व तिथेच तिचा विनयभंग केला. त्यामुळे ती तरुणी घाबरून बाहेर आली. व या घटनेची वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे वरोरा पोलिसांनी भारतीय न्याय सुविधा कलम 74 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी छोटू उर्फ रामु ऋषी गाडगे याला अटक केली. व सूचना पत्र देऊन आरोपीला सोडण्यात आल्याची माहिती आहे.

.      वरोरा शहरात काही दिवसापूर्वी दोन प्राध्यापकांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच मेडिकल स्टोअर मध्ये दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेमुळे वरोरा शहरात मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!