Home सामाजिक सर्वोदय महाविद्यालयात “मतदान जनजागृती कार्यक्रम”

सर्वोदय महाविद्यालयात “मतदान जनजागृती कार्यक्रम”

1312

सिंदेवाही : विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावेत. याकरीता २१ ऑक्टोबर रोजी सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.      सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी भूषविले. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. रिजवान शेख आणि प्रा. अमीत उके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात काही दिवसापूर्वी महाविद्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून मतदान जनजागृती साठी प्रशिक्षण करून आलेले सोहेल पठाण व साहिल शेंडे हे दोन विद्यार्थी होते. त्या पैकी सोहेल पठाण यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या अनुभवातून खूप काही माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून दिले, तसेच अंध, अपंग व्यक्ती, ८५ वर्षांवरील मतदार, प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी जात नसेल तर त्यांच्यासाठी शासनाने जी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे याची सुद्धा माहिती दिली, तसेच निवडणुकीत कुठेही गैरप्रकार दिसून आला अथवा कोणी पैशाची आमिष दाखवून आपले मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असणार तर १९५० या नंबर वर कॉल करू शकता व सिटिझन व्हिजीलंस ऑप वर तक्रार नोंदवू शकता अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

.      कार्यक्रमाला राज्यशाश्त्र विभाग प्रमुख डॉ. मदारे, कार्यक्रम अधिकारी डॉ. रिजवान शेख, प्रा. अमित उके, प्रा. साहेबराव आडे , प्रा. तुकाराम बोरकर तसेच विध्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण विद्यार्थ्याकडून मतदान जनजागृती ची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. रिजवान शेख यांनी पार पाडली.

error: Content is protected !!