दोघी सख्या बहिणी गंभीर जखमी
रस्त्याच्या दुभाजकाला धडकली दुचाकी
विसापूर : बल्लारपूर येथील पेपर मिल वसाहतीत राहणाऱ्या दोघी बहिणी कामानिमीत्त चंद्रपूर येथे गेल्या. बल्लारपूर येथे परतीच्या प्रवासात त्यांची दुचाकी अनियंत्रीत झाली. यामुळे दोघीही दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्या. हा अपघात चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर भिवकुंड परिसरात मंगळवार (दि. २२) रोजी सायंकाळी ४ वाजता झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमीचे नाव अश्विती अजयकुमार पिल्ल ई (23) व अश्विनी अजयकुमार पिल्लई ( १८ )रा.पेपर मिल न्यू कॉलनी, बल्लारपूर असे आहे.
. अश्विती पिल्लई व अश्विनी पिल्लई या दोघीही काही कामानिमित्त चंद्रपूर येथे दुचाकी क्रमांक एम.एच.34 / सी.एल. 2433 ने गेल्या होत्या. चंद्रपूर येथील काम आटोपून त्या बल्लारपूर कडे परत येत होत्या. दरम्यान चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर भिवकुंड परिसरात त्यांची दुचाकी अनियंत्रीत झाली. त्या दुचाकीने रस्त्यावरील दुभाजकाला जबरदस्त धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक अश्विती पिल्लई हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची बहीण अश्विनी पिल्लई हिच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तिला देखील दवाखान्यात हलविण्यात आले. दोघीही बहीण वर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. घटनेचा अधिक तपास बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.


