Home राजकीय सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

839

 

वरोरा
शहरातील डॉ. कलाम चौक येथे आयोजित एका कार्यक्रमात वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते फिरोज पठाण यांनी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी आमदार धानोरकर यांनी फिरोज पठाण यांना काँग्रेस पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. काँग्रेस पक्षाचे विचार तळागळात पोहचवून पक्षाला अधिक बळकट करण्याचे आव्हान आमदार धानोरकर यांनी याप्रसंगी केले.
डॉ. कलाम चौक परिसरात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, विशाल बदखल, मनोज दानव, माजी सभापती छोटूभाई शेख, माजी नगरसेवक राजू महाजन, अनिल झोटिंग, निलेश भालेराव,आसीफ रजा,बोर्डाच्या सरपंचा यशोदा खामनकर, पंकज नाशिककर, सुनील वरखडे, शरद आसुटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत खुळे यांनी तर आभार शैलेश पद्मगिरीवार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शैलेश पद्मगिरीवार, हितेश भालेराव, रुपेश पद्मगिरीवार, अजय गेघाटे, हिमालय मडावी, इमरान अन्सारी, प्रणय धोपटे, रवी गेघाटे, जुनैद शेख, सादिक अन्सारी, अक्षय चोपणे आदी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न घेतले.पक्ष प्रवेश कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

error: Content is protected !!