हाती आलेल्या सोयाबीन पिकांना आले अंकुर
शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाणार
संदीप झाडे
कुचना : वरोरा भद्रावती तालुक्यात नुकताच झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांची चांगलीच दाणादाण झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकर्यांनी सोयाबीनची कापणी करून ठेवली आहे. मात्र परतीच्या पावसामुळे हातात आलेले सोयाबीन पीक हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जणू काही या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे दिसून येत आहे.
. मागील वर्षी सोयाबीन पिकावर येल्लो मोझ्याक रोगाने वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने त्यावर मात करण्यासाठी या वर्षात सुद्धा सोयाबीन पिकांची पेरणी केली चांगली मशागत केली मागील वर्षातली तूट या वर्षी भरून काढायची या हेतूने कष्ट घेतले चांगले पीक आले आता सोयाबीन कापायची वेळ आली आणि आता परतीच्या पावसाने हाती आलेले पीक वाया जाण्याच्या मार्गांवर आहे.
. सोयाबीन पिकांची मजु्रांकडून कापणी सुरु आहे. मात्र गेल्या चार पाच दिवसापासून परतीचा जोरदार पाऊस येत असून सोयाबीन पीक पाण्यात ओल होत असल्याने आता सोयाबीन शेंगामध्येच कोंब येण्याची चित्र दिसत आहे. तळहाताच्या फोळासारखी पिकांची काळजी घेणारा शेतकरी मात्र निसर्गाच्या लहरी पणामुळे हतबल होताना दिसत आहे. शेतात वाळलेले कापनीला आलेले पीक उभे आहे. मात्र ऐन या वेळेला परतीचा पाऊस बरसल्याने हाती येणारे पीक शेतामध्येच खराब होण्याच्या मार्गांवर आहे. वाळलेल्या सोयाबीच्या झाडाच्या शेंगा सततच्या पावसाने ओले होऊन त्यातील दाणे फुगून त्याला कोंब येण्याची चिन्ह दिसत आहे तर काही कापलेले सोयाबीन पाण्यातच भिजत आहे. मेघ गरजानेसह,विजा आणि वादळी वाऱ्याने शेत पूर्णपणे जलमय झाले असून या अतिवृष्टीने शेती व्यवसायावर पुन्हा एकदा धोक्याची घंटा दिसून येत आहे. महसूल विभाग प्रशासन आता यावर काय करणार याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागले आहे. गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून हाता तोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस पीक या पाण्याने नष्ट होण्याच्या मार्गावार आहे.
पीक विमा कंपनी नॉट रिचेबल पीक विमा कंपनीला फोन केल्यास लागत नाही आणि ऑनलाईन तक्रार केल्यास 15 दिवसानंत्तर पाहणी करण्यासाठी येते. तेव्हा शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कसे मूल्यमापन करणार व नुकसान भरपाई कशी मिळणार तेव्हा शेतकऱ्यांना आव्हान आहे कि, तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पीक विम्याची लेखी तक्रार द्यावी व त्याची रिसिव्हड कॉपी घ्यावी. जेणेकरून शेतकर्यांना पीक विमा न मिळाल्यास कृषी विभागाला जबाबदार धरता येईल. नरेंद्र जिवतोडे, शेतकरी नेते तथा अध्यक्ष, शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूर
शेतकऱ्यांनी फोन द्वारे किंवा ऑनलाईन तक्रार करावी गेल्या सहा – सात दिवसापासून परतीच्या पाण्याने कापणीला आलेले सोयाबीन पीक पाण्याने ओले झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी फोन द्वारे किंवा ऑनलाईन तक्रार करावी ज्यात पिकांची स्टेज टाकावी. एक दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे पूर्ण आकडेवारी देण्यात येईल. सुशांत लव्हटे, उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा.


