Home चंद्रपुर जिल्हा विशेष स्कूलबस उलटून 25 विद्यार्थी जखमी

स्कूलबस उलटून 25 विद्यार्थी जखमी

1333

हरदोना येथील घटना

गडचांदूर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन भरधाव वेगात असलेल्या स्कूल बस चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने स्कूल बस उलटली. यात बस मधील 25 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी 11 वाजताच्या दरम्यान घडली.

.      कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शाळेत पोहचविण्याचे काम करीत होती. शनिवार सकाळची शाळा आटोपून स्कूलबसने विद्यार्थ्यांना घरी परत नेत असताना हरदोना गावाजवळ स्कूलबस उलटली. ही माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी घाव घेत स्कूल बस मधून विद्यार्थ्यांना बाहेर काढले . बस मध्ये असलेले 25 विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. सदर स्कूल बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे.

आजी – माजी आमदारानी घेतली विद्यार्थांची भेट                                                                                                                                         स्कूलबसचा अपघात झाल्याचे कळताच आमदार सुभाष धोटे व माजी आमदार संजय धोटे यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे प्रत्यक्ष भेटून जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व जखमी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

error: Content is protected !!