तहसीलदार, तालुका क्रिडा निरीक्षकांनी केली पाहणी
चिमूर क्रांती संघटनेच्या निवेदनाची दखल
चिमूर : तालुक्यात क्रिडा संकुल मागील काही महिन्यांपासून कचऱ्याच्या विळख्यात असून याचा त्रास मैदानावर विविध खेळांचा सराव करणाऱ्या क्रिडापटूंना होत आहे. तरी तालुका क्रिडा संकुल त्वरित स्वच्छ करण्याची मागणी प्रशासनाकडे चिमूर क्रांती संघटनेचे विनोद शर्मा यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली होती. याची दखल घेत तहसिलदार व तालुका क्रिडा निरीक्षकांनी क्रिडा संकुलनाची पाहणी केल्याने आता तालुका क्रिडा संकुल लवकरच कात टाकणार असल्याचे बोलल्या जात आहे.
. चिमूर तालुक्याच्या मुख्यालयी असलेले एकमेव क्रिडा संकुल चिमूर शहरात असून याठिकाणी तालुक्याच्या विविध गावातील क्रिडापटू सरावासाठी येत असतात. मागील काही दिवसांपासून या मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत आणि कचरा याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली असल्याचे दृश्य बघून यामुळे या ठिकाणी विषारी साप, विंचू निघत असल्याची भूमिका खेडाळुंनी मांडली असता भितिजण्य वातावरणात विद्यार्थ्यांना सराव करावा लागत आहे.विषारी प्राण्याच्या दंशाने जिवितहानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.म्हणून यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने या कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन खेळाचे मैदान ( क्रिडा संकुल ) कचरा मुक्त करण्यात यावे. अशी मागणी चिमूर क्रांती संघटनेचे विनोद शर्मा यांनी निवेदनातून तहसीलदार राजमाने यांचे कडे केली होती याबबाबत तहसीलदार राजमाने यांनी निवेदनाची दखल घेत दोन दिवसातच तालुका क्रिडा निरीक्षक यांना बोलावून क्रिडा संकुलनाची पाहणी करीत विद्यार्थ्यांशी व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या जनतेशी चर्चा करीत तात्काळ क्रिडा संकुलणाची स्वच्छता करण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी चिमूर क्रांती संघटनेचे विनोद शर्मा,तहसीलदार राजमाने,विजय डोहबाळे तालुका क्रिडा निरीक्षक तथा विद्यार्थी तसेच खेडाळू व आदींची उपस्थिती होती.


