नागभीड : अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणार्या खवल्या मांजराचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना नागभीड – नागपूर मार्गावरील बिकली फाट्या जवळ शनिवारी रात्री च्या सुमारास घडली. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय नागभीड येथे खवले मांजरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
. प्राप्त माहितीनुसार नागभीड येथील झेप निसर्गमित्र संस्थेचे क्षितिज गरमडे आणि रोहित गावंडे हे बाहेरगाववरुन नागभीड येथे परत येत असताना नागभीड – नागपुर मार्गावरील बिकली फाट्या जवळ रस्त्याच्या बाजूला मृत अवस्थेत पडले होते. क्षितिज गरमडे आणि रोहित गावंडे यांच्या निदर्शनास आले. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच झेप निसर्गमित्र संस्थेचे सदस्य व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . त्यानंतर पंचनामा करून मृत खवल्या मांजराचे शविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय नागभीड येथे खवले मांजरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मृत खवले मांजर मादा जातीचे असून त्याचे वय अंदाजे अडीच वर्षाचे असल्याचे समजते.
. यावेळी एसीएफ गायकवाड, सालकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार, नेरलवार, वनरक्षक नवघडे, जिवतोडे, कुथे यासह झेपचे निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन नागरे, उपाध्यक्ष अमोल वानखेडे, सचिव अमित देशमुख, पराग भानारकर, क्षितिज गरमडे, विरू गजभे, गुलाब राऊत, तुषार ठाकरे, रितेश कोरे, रणजीत मेश्राम, जितेंद्र शामकुडे, आशिष कुंमरे उपस्थित होते.


