Home चंद्रपुर जिल्हा विशेष राज्यातील चर्मकार बांधवांची १ आक्टोंबरला मुंबईला धडक

राज्यातील चर्मकार बांधवांची १ आक्टोंबरला मुंबईला धडक

1331

चंद्रपुरात पार पडली निर्धार बैठक

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जय्यत तयारी

विसापूर : राज्यातील चर्मकार बांधवांच्या प्रलंबित समस्या शासनस्तरावर सोडविल्या जात नाही. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातील कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नाही. यामुळे समाज बांधवात तीव्र नाराजी आहे. याचा सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार राज्यातील चर्मकार बांधव येत्या १ आक्टोंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धडक देणार आहेत. या संदर्भात चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह जिल्ह्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाची महत्वपूर्ण बैठक शनिवारी पार पडली.यामध्ये निर्धार व्यक्त करून मोर्चा यशस्वी करण्याबाबत मंथन करण्यात आले.

.        यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे म्हणाले, राज्यात आपला समाज निर्णायक आहे. मात्र,राज्यकर्त्यांनी आमच्या समस्या सोडविण्यासंदर्भात दिरंगाईचे धोरण अवलंबिले आहे. चर्मकार बांधवांची कुचंबणा करीत आहे. यामुळे समाजात असंतोष निर्माण होत आहे. आता आपल्याला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या समाजाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी येत्या १ आक्टोंबर ला मुंबई येथील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जायचे आहे. निर्धार पक्का करा.समाजाला न्याय मिळावा. हाच आपल्या संघटनेचा निर्धार आहे, असे संबा वाघमारे यांनी सांगितले.

.        यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश निरीक्षक गजानन भटकर, अध्यक्ष माधवराव गायकवाड, विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे, महिला आघाडी उपाध्यक्ष समिक्षा भटवलकर, उपाध्यक्ष देवानंद लांडगे, विदर्भ उपाध्यक्ष हिरामण खंडाळे, युवक आघाडीचे अध्यक्ष प्रणय बसेशंकर, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष विप्लव लांडगे, परभणीचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, जेष्ठ नेते माऊली महाराज पार्डीकर, विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष नितीन अंडेलकर, गटई कामगार संघटना जिल्हाध्यक्ष संतोष तांडेकर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्यातील चर्मकार बांधवांनी मुंबईला धडक देण्यासाठी मोठ्या संख्येने जाण्यासाठी निर्धार करून संघटनेला सहकार्य करावे, असे जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे यांनी विनंती केली.

error: Content is protected !!