दारूच्या नशेत तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या

105

सावरी (बी) येथील घटना

चिमुर : दारूच्या नशेत तलावात उडी टाकून एका युवकाने आत्महत्या केली. ही घटना चिमुर तालुक्यातील सावरी (बी) येथे घडली. चेतन राजेंद्र खोब्रागडे (३४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

.       चेतन हा मजुरीचे काम करत होता. मात्र, तो दररोज जास्त दारू पिऊन विनाकारण वेड्यासारखे बडबड करत असल्याचे करत होता. बुधवारी चेतनने तलावात उडी टाकून एका युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात माहिती दिली. दरम्यान, शेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पुलिस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस अंमलदार मदन येरणे व प्रशांत गिरडकर पुढील तपास करीत आहे. मृतदेह वैदकीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविले आहे.