Home चंद्रपुर जिल्हा विशेष दोन अत्याचारांच्या घटनेने बल्लारपूर शहर हादरले

दोन अत्याचारांच्या घटनेने बल्लारपूर शहर हादरले

1378

एका घटनेतील पिडीत मुलीने घेतला गळफास 

दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद 

विसापूर / कोठारी : राज्यात बदलापूर येथून सुरू अल्पवयीन बालिका वरील अत्याचारांच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. मात्र ही मालिका थांबता थांबत नाही. आता बदलापूर नाही बल्लारपूर असेच या अत्याचारांच्या घटनावरून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. बल्लारपूर शहरात दोन अत्याचारांच्या घटनेमुळे हादरले आहे. या घटनेतील एका अल्पवयीन मुलीने अत्याचार सहन न झाल्यामुळे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. या दोन्ही घटनेतील आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

.        एका घटनेतील मतिमंद महिलवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे चंदू बालू भुक्या (५५) रा. शिवनगर, बल्लारपूर असे, तर दुसऱ्या घटनेतील आरोपीचे शिवम दिनेश दुपारे (१९) रा. मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर असे नाव असून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे बल्लारपूर शहरातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

.        बल्लारपूर येथील शिवनगर वार्डात मतिमंद महिला घरी एकटीच होती. तिची आई सकाळी घरून कामाला गेली होती. नेमकी हिच संधी आरोपीला मिळाली. आरोपी चंदू भुक्या याने मतिमंद महिलेवर मद्यधुंद होऊन अत्याचार केला. हा घृणास्पद प्रकार पिडीत महिलेची आई सांयकाळी घरी आल्यावर उघडकीस आला. हि घटना सोमवार (दि. २) सप्टेंबर रोजी घडली. या घटनेची तक्रार पिडीत महिलेच्या आईने मंगळवार (दि. 3) रोजी बल्लारपूर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023अंतर्गत 64(2) के, 332 ( क ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.        दुसऱ्या घटनेला अल्पवयीन मुलीसोबत प्रेम प्रकरणाची किनार असल्याची माहिती आहे. आरोपी शिवम दुपारे व अल्पवयीन मुलीत काही दिवसापासून प्रेम संबंध होते. त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचा विश्वास संपादन केला. मंगळवार (दि. 3) सप्टेंबर रोजी आरोपी शिवम ने त्या अल्पवयीन मुलीला शहरातील एका लाजवर घेऊन गेला. तिथे अल्पवयीन मुली सोबत अत्याचार केला. हि घटना घरच्या नातेवाईकांना माहित झाली. पिडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या घटनेमुळे अल्पवयीन पिडीतेवर गंभीर आघात झाला. हा आघात सहन न झाल्यामुळे बुधवार (दि. ४) रोजी दुपारी घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.

.        या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तिच्या प्रेताचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात, चंद्रपूर येथे नेण्यात आल्याची माहिती आहे. बल्लारपूर पोलिसांनी अल्पवयीन पिडीतेच्या अत्याचार प्रकरणी आरोपी शिवम दुपारे याचेवर पॉक्सो 4 (1) आणि भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 64 (1) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

.        उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गाडे, उपनिरीक्षक वर्षा नैताम, उपनिरीक्षक गोविंद चाटे आणि पोलीस पथक करीत आहे.

error: Content is protected !!