Home राजकीय दादापुर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदीप चौधरी यांची निवड

दादापुर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संदीप चौधरी यांची निवड

1697

वरोरा : तालुक्यातील ग्रामपंचायत दादापुरच्या वतीने आयोजित आमसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 30 ऑगस्ट रोजी पार पडली. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप मधुकरराव चौधरी यांची एकतर्फी बहुमताने निवड झाली. त्यांनी केलेले सामाजिक कार्य व गावाविषयी असलेली तळमळ बघून पुन्हा एकदा त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी अभिनंदन केले आहे.

.       या निवडीवेळी शिवसेना उपविभाग प्रमुख दिलीप बोधाने, शिवसैनिक मंगेश खाडे आणि अन्य ग्रामवासी उपस्थित होते. दादापुर ग्रामस्थांनी या आमसभेत भाग घेऊन अनेक जनहितार्थ प्रश्न मार्गी लावले. चौधरी यांच्या निवडीमुळे दादापुर ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!