Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतात वीज पडून महिला ठार

शेतात वीज पडून महिला ठार

1342

मुल तालुक्यातील भेजगाव येथील घटना

मुल : तालुक्यात दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतात काम करीत असताना वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

.     लताबाई बंडू चटारे (62) असे मृत महीलेचे नाव आहे. दुपारच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने शेतात असलेल्या बोरीच्या झाडाचा आसरा त्या महिलेने घेतला व काही कडायच्या आतच त्याच झाडावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर वीज ही थंड स्वरूपाची होती घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील एस. डि. गणवीर यांनी प्रशासनाला माहिती दिली. यावेळी मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तर महसूल प्रशासनाच्या वतीने भेजगाव साज्याचे तलाठी भास्कर मेश्राम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

.     उपजिल्हा रुग्णालय मुलते उत्तरीय तपासणी करिता नेले असून शुक्रवारला अंतिम संस्कार होणार आहेत. मृतक लताबाई चटारे ही पायाला दुखापत झाली असल्याने मागील महिनाभरापासून एकदाही शेतात गेली नव्हती मात्र आज शेतात जाण्याचा तिचा पहिलाच दिवस आणि विज पडल्याची घटना घडल्याने व सुसभावी असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!