गडचांदूर शहरात बॉम्ब ? 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात

61

परिसरात खळबळ

बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल

बस स्थानकासमोरील कापड दुकानातील घटना

गडचांदूर : शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या भगवती कलेक्शन कापड दुकानात अज्ञात व्यक्तीनी सकाळी 9.21 वाजताच्या सुमारास एका थैली मध्ये बॉम्ब ठेवल्या असल्याची माहिती दुकानदारांना दिली. बॉम्ब असल्याची माहिती गडचांदूर परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली. दरम्यान गडचांदूर पोलिस व बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल होत बॉम्ब सदृश्य बॅगची तपासणी सुरू केली आहे. गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्बविरोधी पथक गडचांदूरसाठी दाखल झाले असून वृत्तलिहेतोवर भर पावसातही बॉम्ब रिफूस करण्याची कार्यवाही सुरूच होती तर गडचांदूर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

.       मंगळवारी सकाळी 9.21 वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरात असलेल्या भगती कलेक्शन समोर एका बँगेत दोन वायर जोडलेले जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. बॉम्ब असल्याची वार्ता गडचांदूर शहरात पसरताच नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तगडा पोलिस बंदोबस्तासह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, बॉम्ब निकामी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्बविरोधी पथक गडचांदूरकडे दाखल झाले आहे. सदर अज्ञान व्यक्तींनी भगवती कापड केंद्र मालकांना फोन द्वारे तुमच्या दुकानात बॉम्ब असलेली पिशवी ठेवल्याची माहिती दिली सकाळी ९.२१ च्या सुमारास चेहऱ्यावर पूर्ण बांधून पिशवी ठेवण्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

.       दुकान मालकांनी गडचांदूर पोलिसांना संपर्क करून पोलिसांना घटना सांगितली गडचांदूर पोलिसांनी सदर घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली. काही तासानंतर चंद्रपूर येथील बॉम्ब शोधक पथक शहरात घटनास्थळी दाखल होऊन शोध घेतला परंतु त्यांना ते स्पष्ट झाले नाही लगेच गडचिरोली बॉम्ब शोध  पथकांनी बॉम्ब आहे ही सदृश वस्तू याची शहानिशा करून  कारवाही सुरू केली.

.       यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्कामा सुदर्शन, गडचांदूर पोलीस आणि कोरपना तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. पिशवीत ठेवलेल्या बॉम्ब नेमका कोणता, त्याची तीव्रता किती या बाबतची माहिती नसून बातमी लिहिस्तोवर भर पावसातही  बॉम्ब रिफूस करण्याची कार्यवाही सुरूच होती. तर गडचांदूर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवीत दोन संशयितना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.