रान डुकराच्या हल्ल्यात राजेश कोठारी जखमी

33

भद्रावती : येथील प्रतिष्ठित सराफा व्यापारी तथा माजी शिवसेना तालुका प्रमुख राजेश मिठालाल कोठारी यांचेवर एका रानटी डूकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना भद्रावती वन परिक्षेत्रातील मासळ येथील त्यांच्याच शेतात दि.१८ जूनला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

.      त्यांचे मासळ येथील आष्टी फाट्याजवळ स्वतःच्या मालकीचे शेत असून नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. शेतातील फुले तोडत असताना त्यांच्यावर शेतात दबा धरुन बसलेल्या एकट्या रानडूकराने त्यांच्यावर अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्या उजव्या पायाच्या घुटण्याला चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली. या घटनेची तक्रार त्यांचे भाऊ शैलेश कोठारी यांनी वन विभागाकडे केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.