Home चंद्रपुर जिल्हा विशेष वडधा तुकूम येथे खुलेआम अवैध दारू विक्री

वडधा तुकूम येथे खुलेआम अवैध दारू विक्री

1622

वरोरा : वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडधा तुकुम येथे अवैद्य देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय कित्येक दिवसापासून सुरू आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आता मुजोर दारू विक्रेते खुलेआम दारू विक्री करत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे.

.       वरोरा तालुक्यातील वडधा तुकुम हे गाव आत मध्ये आहे. यामुळे या गावाकडे पोलिसांचे लक्ष वेधल्या जात नसल्याचा फायदा घेत गावात अवैध दारू विक्रेत्यांनी डोके वर काढले आहे. या अवैध दारू विक्री मुळे अल्पवयीन मुले व्यसनाधीनतेच्या आहारी गेले आहेत. गावातील शांतता भंग होत चालली आहे. यामुळे दारू विक्रेत्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळने गरजेचे आहे.

error: Content is protected !!