मृतकाच्या मुलाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
सावरगाव वाढोणा मार्गांवर अपघात प्रकरण
पोलिस विभागानेच केले सेटलमेंट साठी प्रयत्न
नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी कुसुम अरुण उकुंडे या तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव वाढोणा रोडने जात असताना दिनांक १७ मे २०२४ ला सावरगाव वाढोणा रोडवर त्यांचा अपघात झाला त्यात कुसुम उकुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती तळोधी पोलिसांना देण्यात आली.
. या घटनेची पोलिस विभागणी कायदेशीर नोंद न घेता हार्वेस्टर मालक यांच्याशी आर्थिक व्यवहारपोटी थातूर मातुर चौकशी करून प्रकरण दाबण्याचा पोलीस निरीक्षक, व चौकशी अधिकारी चंद्रकांत लांबट तळोधी हे करीत असल्याचा आरोप मयताचा मुलगा किशोर उकुंडे यांनी केली आहे.
. घटनास्थळी पंचनामा न करीता उपस्थिती असलेल्या मृत्यूकाचा नातेवाईकांचा समोर पंचनामा न करीता हार्वेस्टर मालकशी जवळीक असलेल्या ट्रॅव्हल्स चा मालक देवा बोरकर व ज्ञानेश्वर बोरकर घटनास्थळी उपस्थित नसताना त्यांचा बयान धारक म्हूणन चुकीची बयान नोंदविण्यात आले. त्याचप्रमाणे आम्ही दलीत असल्यानेच माझे आईच्या मृतदेह ऍम्ब्युलन्स मध्ये टाकून दवाखान्यात न नेता पोलीस स्टेशन ला तब्बल दीड तास ताटकळत ठेऊन अहवेलना केली असही आरोप किशोर उकुंडेयांनी केला आहे.
. वास्तविक पाहता ज्या हार्वेस्टर ने कुसुम उकुंडे यांना धडक दिली त्या मालकावर गुन्हा नोंद करायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा नोंद न करीता उलट मृतकाच्या नातेवाईकाना पंचासमक्ष आर्थिक बाजू घेऊन प्रकरण दाबून घेण्याचा उफलातून सल्ला तळोधी पोलीस विभागणी दिल्याचा आरोप मयताचा मुलगा किशोर उकुंडे नेरी यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
. सदर अपघात प्रकरणात दोषी असणाऱ्यावर कारवाईंना न करणे हार्वेस्टर चालकाला मालकाला वाचवण्यासाठी ठाणेदार व प्राथमिक चौकशी अधिकारी यांनी सेटलमेंट साठी पूर्ण प्रयत्न केले. या प्रकरणाला दाबण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला असल्याने यात दोषी असलेल्या हार्वेस्टर मालक, चालक आरोपी असून त्यांना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणारे ठाणेदार प्राथमिक चौकशी अधिकारी पूर्णपणे जबाबदार आहे त्यामुळे प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करावी अन्यथा पूर्ण परिवारासह माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांच्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद केला आहे.पत्रकार परिषदेला भाजपा नेते माजी जी प सदस्य विलास डांगे, माजी शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सहारे, किसन कांबळे सामाजिक. कार्यकर्ता,मृतकाचा मुलगा किशोर उकुंडे व विनोद उकुंडे उपस्तित होते.
प्रत्येक्ष साक्षदार यांचे जवाब घेतले आहेत.त्या ठिकाणी हार्वेस्टर नव्हते.स्कुटी चालक मध्यपान पिऊन गाडी चालवीत होता तसा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे.दुचाकी वेगवान चालवील्याने दुचाकी स्लिप होऊन अपघात घडला. अर्जितसिंग देवरे, पोलीस निरीक्षक तळोधी बाळापूर


