Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपुर पोलीसांनी पकडला दारुचा साठा

बल्लारपुर पोलीसांनी पकडला दारुचा साठा

1384

२९ हजाराची दारू जप्त

राजेंद्र वॉर्डातील कारवाई

कोठारी : बल्लारपुर पोलीसांनी राजेंद्र प्रसाद वार्डात दारुचा साठा पकडला असून २९ हजार २०० रुपये चा मुद्देमाल जप्त केला.

.        बल्लारपूर पोलीस प्रोव्हीशन व जुगार रेड कामी पेट्रोलींग करित असतांना गोपनिय माहिती वरुन डॉ. राजेंद्र प्रसाद वार्डातील अर्चना राऊन हिचे घराची झडती दरम्यान बल्लारपूर पोलीसांनी धाड टाकली असता किंमत अंदाजे ७ हजार रु. दोन काळया रंगाच्या स्कुल बॅगमध्ये एकूण २०० नग रॉकेट संत्रा देशी दारु कंपनीच्या प्रत्येकी ९० एम. एल. नी भरलेल्या प्लास्टीक सिलचंद बॉटल व २२ हजार २०० रु. दोन काळया रंगाच्या स्कुल बॅगमध्ये १२ नग रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनीच्या विदेशी दारु असा एकुण २९ हजार २०० रु. चा माल पकडला. आरोपी महिला नामे अर्चना प्रमोद राऊत (२५) रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपुर, जि. चंद्रपुर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

.       सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू , दिपक साखरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, सफौ गजानन डोहीफोडे, पोहवा रणविजय ठाकुर, पुरुषोत्तम चिकाटे, वशिष्ट रंगारी, शरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माथनकर व मपोअं सिमा पोरते यांनी केली आहे.

error: Content is protected !!