परळी वैद्यनाथ : महाराष्ट्रामध्ये १९७२ च्या नंतर २०२४ ला खूप मोठा दुष्काळ पडला पण निष्क्रिय महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकार सर्व बाजूंनी दुष्काळ हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप महाराष्ट्र ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. २०२३ च्या खरीप व रब्बी मध्ये पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर ओढ दिल्यामुळे जनावरासाठी चारा छावण्या, पाणी पुरवठा संदर्भातील संकट संपूर्ण राज्यामध्ये उभे राहिले असून ग्रामीण व शहरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर आज जाणवत आहे.
. शासनाकडून तलावातील पाणीसाठा, विहीर बोर अधिग्रह करण्यास विलंब प्रशासनाकडून झालेला आहे. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाकडून सर्व विभागीय महसूल आयुक्तांकडून जिल्हास्तरीय तालुकास्तरीय मंडळ निहाय तात्काळ अहवाल मागून सर्व दुष्काळा हाताळण्या संदर्भातले निकषाचे पालन करण्यास शासन स्तरावर तातडीचे आदेश देण्यात आले परंतु प्रशासनाकडून हाताळण्यास राजकीय दबावापोटी विलंब झाल्याचा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला. शासन स्तरावरून दुष्काळातला विविध सवलती बाबत शासनाकडून आदेश देऊनही बँका शेतकऱ्याकडून वसुलीची कारवाई करीत आहेत, त्यांचे खाते घोटवित आहेत. तरीही प्रशासनाकडून शेतकऱ्याला दिलासा देण्यासंदर्भात ठोस पावले उचलली जात नाहीत, शेतीवरील कर्ज वसुलीसाठी थांबवणे व त्याचे पुनर्गठन करणे, कृषी पंपाचे वीज बिलात नियमानुसार सवलत देणे, रोजगार हमीचे कामे चालू करणे, पिण्याचे पाणी टँकर द्वारे पुरवठा करणे, शालेय विद्यार्थ्यांचे संपूर्णपणे फी माफ करणे, सुशिक्षित तरुण पिढीतील सर्व युवकांसाठी “विशेष बाब” म्हणून रोजगार उपलब्ध करून देणे असे शासनाकडून दुष्काळा संदर्भात आदेश जरी असले तरी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभाग स्तरीय प्रशासनाकडून हाताळण्यास विलंब झालेला आहे.
. शेतकऱ्यासाठी अतिवृष्टीचे, दुष्काळ निधी व २०२० पासून आज तागाचे पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यात वर्ग करणे, कृषी पंपाची वीज तोडण्यात येऊ नये. पावसाने ओढ दिल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्यात नैसर्गिक आपत्ती तयार झाली असून शेतकऱ्याच्या शेतीमालाचे बाजारपेठेत अवमूल्यन झाले आहे. शासनाकडून शेतीमाला बाबतीत आयात, निर्यात धोरण केंद्र व राज्य सरकारच्या चुकीचे हाताळले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील त्रिमूर्ती सरकारकडे दुष्काळ हाताळण्यात संपूर्णपणे अपयश आल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी चे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे नी केला.


