भद्रावती : तालुक्यातील नंदोरी येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर किसनाजी कामडे (६८) यांचे रविवारी सकाळी ९ वाजता नागपूर येथील स्पंदन हर्ट हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते गुरुदेव सेवा मंडळाचे व हनुमान देवस्थान नंदोरी चे आजीवन सदस्य होते.
. शेवट पर्यंत त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाचे काम केले. त्यांच्या अचानक निधनाने नंदोरी गावात शोककळा पसरली आहे. नंदोरी येथील स्मशानभूमीत दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुखाग्नी देण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुल, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.


