Home Breaking News ट्रॅक्टर उलटले चालक ठार : मजूर गंभीर

ट्रॅक्टर उलटले चालक ठार : मजूर गंभीर

1413
  • बल्लारपुर येथील घटना 

विसापूर : बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्डातील ट्रक्टर येत होता. दत्त मंदिर परिसरात ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटले.यामुळे ट्रक्टर पलटी झाला.ट्रक्टर उलटल्याने चालक ठार झाल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान बल्लारपूर येथे घडली. या अपघातात ठार झालेल्या ट्रक्टर चालकाचे नाव मोतीराम कोहरे ( ५५ ) रा.दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर असे आहे.

मोतीराम कोहरे हे ट्रक्टर क्र.एम.एच. 34/ ए.बि.2362 घेऊन येत होते.दरम्यान कल्लूरवार ले -आाऊट परिसरात चालकाचे ट्रक्टर वरून नियंत्रण सुटले.परिणामी ट्रक्टर उलटून चालक ट्रक्टर खाली आला.यात त्याचा मृत्यू झाला. ट्रक्टर वरील मजुर प्रेमसिंग चंदेल हा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी घटनेचा पंचनामा करून जखमीला दवाखाण्यात उपचारार्थ दाखल केले.या घटनेचा पुढील तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख व उपनिरीक्षक गोविंद चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक करत आहे.

error: Content is protected !!