Home चंद्रपुर जिल्हा विशेष ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे उन्हाळी धानपीक धोक्यात

ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे उन्हाळी धानपीक धोक्यात

1319
  • नवीन ट्रान्सफॉर्मर लावून देण्यासाठी वासेरातील नागरिकांची पायपीट

सिंदेवाही :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून वासेरा येथे लावण्यात आलेले बनसोड डी पी येथील ट्रान्सफॉर्मर हे निकृष्ट दर्जाचे व कमी पावरचे असल्याने त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये नेहमी बिघाड येत असून वारंवार फेज उडत असल्याने उन्हाळी धानाचे शेतीला पाणी पुरवठा होत नाही. परिणामी धानाचे पीक करपण्याच्या स्थितीला आलेला आहे. त्यामुळे बनसोड डी पी वर नवीन २०० पावरचे ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावे. अशी मागणी उपविभागीय अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नवरगाव यांना दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे.

.      वासेरा येथील बनसोड डी पी वर १०० पॉवर चे ट्रान्सफॉर्मर लावलेले आहे. तसेच याच डी पी वरून अनेक कृषी पंपांना आणि काही घरगुती ग्राहकांना कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे सदर ट्रान्सफॉर्मर वर जास्त दाब येतो. आणि त्यामुळें डी पी वरील फेज उडतात. परिणामी विद्युत पुरवठा बंद होत असल्याने शेतीला पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. सदर डी पी स्थलांतरित करण्यासाठी मागील काही दिवसापूर्वी जागेची पाहणी करून जागा निश्चित केली होती. मात्र अजूनही त्या जागेवर नवीन डी पि लागलेली नाही. त्यामुळे वासेरा येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी सदर डी पी वर नवीन २०० पॉवर चे ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावे. अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय नवरगाव येथील उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले आहे. वीज वितरण कंपनीने या मागणीकडे त्वरित लक्ष घालून नवीन २०० पॉवरचे ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावे. आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे. अशी मागणी निवेदनातून केली आहे.

error: Content is protected !!