Home चंद्रपुर जिल्हा विशेष क्षुल्लक कारणावरून अश्चिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

क्षुल्लक कारणावरून अश्चिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

1259

चिमूर पोलिसात गुन्हा दाखल

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथील शांती वार्ड क्र 2 मध्ये रस्त्यावर पाणी टाकले या शुल्लक कारणावरून भांडण झाले. आरोपीने फिर्यादीला अश्चिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने चिमूर पोलीसात तक्रार दाखल केली. मात्र दहा दिवस होऊनही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने फिर्यादी व त्यांचे कुटुंब दहशतीत वावरत आहेत. तसेच आरोपी पुन्हा तेच कृत्य करीत असल्याने चिमूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी कुटूंबिया कडुन होत आहे.

.     सविस्तर असे की नेरी येथील शांती वार्ड क्र दोन मध्ये फिर्यादी शोभा अशोक तिडके यांचे घर असून त्यांच्या समोरच आरोपी मंगला महादेव हिंगे यांचे घर आहे. मंगला हिंगे ह्या तिथे परिवारासह राहत आहेत मात्र शुल्लक कारणावरून नेहमीच भांडणे व शिवीगाळ करीत असतात सदर घटनेच्या दिवशी सकाळ च्या सुमारास शोभा तिडके यांनी समोरील रोडवर पाणी टाकले असता सदर पाणी हे मंगला हिंगे याच्या घरासमोरील नालीत गेले त्यामुळे काहीही कारण नसताना मंगला हिंगे हिने घरातून बाहेर निघत रोडवरून शोभा तिडके यांना अश्चिल शब्दात शिवीगाळ केली व रोडवर पुन्हा पाणी टाकशील तर मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिली तसेच याबाबत माझे शोभा तिडके यांचे पती अशोक तिडके हे आरोपी ला समजवायला गेले तर आरोपीच्या मुलाने घरातून बाहेर येत अशोक तिडके यांना काडीने मारायला धाव घेतली आणि अतिशय अश्चिल भाषेत शिवीगाळ करीत अंगावर धावून आला आणि धमकी दिली यावेळी तिथे दोन जण उपस्थित होते सदर प्रकरणाने फिर्यादीला व कुटूंबाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने आणि त्याची दहशत निर्माण झाल्याने तात्काळ पोलीस स्टेशन गाठीत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून सदर आरोपीवर भांदवी 294 506 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.     मात्र दहा दिवस होऊनही पोलिसांनी आरोपीवर कुठलीही कारवाई केली नसल्याने फिर्यादीचे कुटूंबात दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी तात्काळ आरोपीवर कारवाई करावी आणि दहशतीच्या बाहेर काढावे आरोपी पासून जीविताला धोका आहे तेव्हा तात्काळ कारवाई करावे असे फिर्यादीच्या कुटूंबियाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!