Home सामाजिक राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटनेच्या महाराष्ट्र सचिव पदी शैलेंद्र बारसागडे

राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटनेच्या महाराष्ट्र सचिव पदी शैलेंद्र बारसागडे

1242

नागभीड : तालुक्यातील कन्हाळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव शैलेंद्र बारसागडे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटन, नवी दिल्ली या संघटनेच्या महाराष्ट्र सचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

.       शैलेश बारसागडे हे इंजीनियरिंग शाखेतून एज्युकेटेड आहेत. परिस्थितीवर मात करून लोकांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत असतात. स्वाभिमानी, नेक आणि बाणेदारपणा हा त्यांचा स्थायीभाव असून ते सुस्वभावी आहेत. त्यांच्या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. मदन रामटेके, प्रदेश उपाध्यक्ष कार्तिक मेश्राम, महाराष्ट्र राज्य जनरल सचिव अविनाश लांडगे, वंचितचे जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रभान रामटेके, मधुकर वानखेडे, जिल्हा महासचिव, मधुकर उराडे, जिल्हा महासचिव सुभाष थोरात, प्रा.पुरानीक गोंगले, जिल्हाध्यक्ष नंदिनी बारसागडे, अनिकेत गोडबोले, जिल्हा युवा उपाध्यक्ष हर्षवर्धन कोठरकर, शहर युवा महासचिव श्रीकांत खोब्रागडे, जिवलग खोब्रागडे, पत्रकार राजेश बारसागडे, डॉ. साहेबराव बारसागडे, पत्रकार तुलोपचंद गेडाम, लिलाधर वंजारी, शुभम मंडपे, डॉ. बाळासाहेब बन्सोड इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!