सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा – प्रवीण वाघे
आंबे, नीम, आजन साग व इतर झाडांचा समावेश
नेरी : तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नेरी क्षेत्रातील सावरगाव कारघाटा, चिखलापार खरकाडा शेतशिवारातील नाल्यातील व नाल्याला लागून असलेली मुख्य मार्गावरील आंबे, साग आजन, नीम इतर अनेक झाडाची वनविभागाच्या नियमांना बगल देत कंत्राटदाराने अवैद्य रित्या कत्तल केली आहे. सदर कत्तल ही एक महिना पूर्वीपासून सुरू आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे या झाडांच्या कत्तली बाबत वरिष्ठ अधिकार्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाही करावी. अश्या मागणीचे निवेदन प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी एका निवेदनाद्वारे उपवनसंरक्षक वनविभाग ब्रम्हपुरी यांना दिले आहे.
. सविस्तर असे की, या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तोडण्याची परवानगी कंत्राटदाराने क्षेत्र सहायक अधिकारी नेरी यांच्याकडून घेतली. तेव्हा शेतातील झाडे खसरा नुसार तोडली मात्र यासोबत मुख्य मार्गावरील मोठमोठी आब्याची, निबांची झाडे तोडली तसेच नाल्याच्या आतील साग आजन, झाडाची कत्तल केली. मात्र यात वनविभागाच्या नियमांना बगल देण्यात येऊन नाल्यातील व बाहेरील 30 मीटरच्या आतील झाडाची कत्तल केली यात शेकडो इतर सिसम तर 80 ते 90 सागाची कत्तल केली सदर घटनेची माहिती होताच वनरक्षकांनी जप्तीची कारवाई केली आणि आडजात झाडे जप्त केली. मात्र साग या वृक्षावर कारवाई करण्यासाठी गेले असता कंत्राटदाराने व अधिकारी यांनी कारवाई करू दिली नाही अशी परिसरात चर्चा असल्याची माहिती आहे. काही वन अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी संगनमत करून अर्थहीत साध्य करीत संपुर्ण वृक्ष तोडायला मदत केली. अशी नागरिकांत चर्चा रंगताना दिसत आहेत. साग हे वनविभागाचे सोने म्हणून ओळखले जाते. वनांचे रक्षकच भक्षक होत असेल तर दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडे लावा झाडे जगवा हे वनविभागाचे ब्रीद वाक्य आहे मात्र वनविभागाच्या समोरच वृक्षाची कत्तल होत असेल तर सर्वसामान्यांचे वनविभागावरचे विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही आणि अराजकता माजेल व वृक्षतोड वाढेल.
. सदर बाबतीत प्रहारसेवक प्रवीण वाघे यांनी आतापर्यंत झालेली कारवाईची माहिती मागितली असता क्षेत्रासहायक यांनी कारवाई सुरू असून चार दिवसानंतर कारवाई ची माहिती मिळेल कारवाई सुरू आहे असे उत्तर मिळाल्याची माहिती वाघे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच साग वृक्षच्या बाबतीत अजून कुठलीही कारवाई झाली नसल्याचे नागरिक बोलीत आहेत एक महिना होऊनही कारवाई झाली नसल्याने क्षेत्रसाहायक अधिकारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर वृक्ष कत्तलीमुळे आता नाल्यातील पुराच्या पाणी हे गावाला घेरणार आहे आणि यात गावकऱ्यांचे नुकसान होणार आहे. कारण नाल्यातील एक ते दीड किलोमीटर लाईन मध्ये वृक्ष कटाई झाली आहे. तेव्हा या बेजवाबदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणी होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी केली आहे जर कारवाई झाली नाहीतर नाल्याशेजारी घटनास्थळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


