Home चंद्रपुर जिल्हा विशेष व्हाट्सअप वर अश्लील पोस्ट टाकणे पडले महागात

व्हाट्सअप वर अश्लील पोस्ट टाकणे पडले महागात

1200

तुळशीदास कुळमेथे याच्यावर गुन्हा दाखल

नागभीड : तालुक्यातील सोनुली खुर्द येथील एका इसमाने नागभीड येथील शिक्षकाच्या व्हाट्सअप वर अश्लील पोस्ट टाकली. आणि ती डिलेक्ट करत व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. शिक्षकाने नागभीड पोलिसांत तक्रार करताच व्हाट्सअप वर अश्लील पोस्ट टाकणारे तुलसीदास दामोधर कुळमेथे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

.        सविस्तर वृत्त असे कि, नागभीड येथील शिक्षक अरुण पेंदाम यांच्या व्हाट्सअप वर अश्लील मॅसेजची पोस्ट आली . हे पोस्ट जेव्हा पाहण्यात आले तेव्हा सोनुली खुर्द येथील तुलसीदास कुळमेथे याचा वॉट्सअप नंबर या वरून हे मॅसेज आले होते. काही वेळाने ह्या पोस्ट डिलीट करण्यात आल्या. आणि ह्या पोस्ट त्याने इतर ग्रुपवर टाकल्या. फिर्यादी हे जातीने प्रधान असल्याने जातीच्या ग्रुपवर टाकल्या. या बाबत फिर्यादीने विचारणा केली असता फोनवर अश्लील शिवीगाळ करून धमक्या देत होता. फिर्यादी अरुण पेंदाम यांचे कुटुंब तीन पिढ्या पासून गुरुदेव सेवा मंडळात काम करीत आहेत. त्यामुळे समाजात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

.        अरुण पेंदाम पेशाने शिक्षक असून फावल्या वेळात ते ग्रामगिता प्रचार व प्रसिद्धीचे काम करतात. मात्र गैरअर्जदार तुलसीदास कुळमेथे याने बदनाम करण्यासाठी व प्रतिमा मलीन करण्यासाठी वॉट्सअप ग्रुपवर व समाजाच्या ग्रुपवर असे अश्लील मॅसेज टाकण्यात आले. फिर्यादी अरुण पेंदाम यांच्या रिपोर्ट वरून आरोपी तुलसीदास कुळमेथे सोनुली खुर्द याच्या विरोधात पो. स्टे. नागभीड यांनी कलम 294,501,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!