Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा पकडले

अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा पकडले

1200

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

गडचांदूर : चंद्रपुर जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्कर अवैध  रित्या रेतीचा उपसा करून  रेतीचे चोरटी वाहतूक करीत आहे. या रेती तस्करा विरुद्ध व महसूल व पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून कोरपना तालुक्यातील नारंडा फाटा येथे अवैद्य रित्या रेतीची वाहतूक करणार्‍या चार हायवा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने  पकडत जप्तीची कारवाही केली.

.        कोरपणा तालुक्यात अवैद्य रित्या दिवसा ढवळ्या  रेतीची तस्करी केली जात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा  क्रमांक एम एच ३४ बी जी ९५२०, एम एच ३४ बी झेड ०२२१ , एम एच ३४ बी झेड ५७७३ , एम एच ३४ बी झेड ९३१० ला पकडून त्यात असलेली  प्रत्येकी आठ ब्रास रेती किंमत प्रत्येकी अंशी हजार रुपये सह  तीन प्रत्येकी पन्नास लाख किमतीचे तर एक तीस लाख किमतीचा हायवा ट्रक जप्त करण्यात आला. याप्रकरणी रेती वाहतूक करणारे वाहन चालक व मालक यांचेवर अपराध क्रमांक ४०/२०२४ कलम ३७९,३४ भांदवी अनव्ये गुन्हा नोंद करून पाच आरोपीस अटक करून पोलीस स्टेशन कोरपना यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले.

error: Content is protected !!