Home सामाजिक नेरी येथील लोक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन तथा शिक्षकांचा सत्कार सोहळा 

नेरी येथील लोक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन तथा शिक्षकांचा सत्कार सोहळा

1218

तब्बल 20 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र, 

गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांना बोलावून केला सत्कार

नेरी : नेरी येथील लोक विद्यालयात सण 2002 ते 2004 या वर्षांत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 20 वर्षानंतर स्नेहमीलन व त्यांना शिकविलेल्या शिक्षकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन दि 25 फरवरीला करून आजी माजी सर्व शिक्षकांचा सत्कार करून सर्व वर्गमित्रांना भेटून आनंद साजरा करीत सर्वांना शुभेच्छा देत शालेय परिसरात वृक्षारोपण करून  एक नवा आयाम समाजाला दिला.

.     ज्या गुरूने विद्यार्थ्यांना घडविले त्यांना मोलाचे विचार सांगून दीक्षा दिली आणि जिवनात मोठे करून सुदृढ नागरिक म्हणून घडविले व एक उत्तम नागरिक म्हणून उदयास आणले अश्या गुरूचा सत्कार करण्यासाठी सनातन परंपरा नुसार गुरूंना गुरुदक्षिणा दिली जायची त्याप्रमाणे या काळात सुद्धा सण 20 02 ते 2004 च्या विद्यार्थी बॅच ने त्यांना शिकविलेल्या गुरूंना बोलावून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच गुरूंनी दिलेल्या मंत्राने पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, उत्तम व्यवसायिक होऊन प्रगती साधली असून समाजात मानाचे स्थान निर्माण केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले असून या स्नेहमीलन सोहळ्याच्या आयोजनातून 20 वर्षाअगोदरचे सर्व वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र येऊन सर्वांचे मनोमिलन झाल्याचे मत व्यक्त केले.

.     या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साखरकर तर प्रमुख अतिथी पिसे, दडमल, बोलधने, वाघे,  आष्ट्णकर, श्रीरामे, रमेश करिये,  वासुदेव वाघे,  आष्ट्णकर, घुटके, निमजे, धोंगळे, कामडी, धनराज चांदेकर, इंडोरकर, मोरेश्वर वासेकर, सुरेश पिसे, भाऊराव चौधरी, श्रीधर पंधरे,  रदये,  संदीप चौधरी सर्व शिक्षक उपस्थित होते.  या सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करीत त्यांच्या भावी जीवन सुखमय जावो अशी इच्छा व्यक्त केली.

.     या कार्यक्रमाचे आयोजन संजय बुटले, डॉ सतीश वाघे, प्रशांत पिसे, आशुतोष बोलधने, संतोष मोगरे, हेमंत हजारे, पूनम निमजे, प्रीती आष्ट्णकर, जोती भुडे आदीसह 2002 ची संपूर्ण बॅच मधील सर्व विद्यार्थी यांनी केले स्नेहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!