पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती.
जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी होणार शिबिरासाठी रवाना
वरोरा – भद्रावती विधानसभेत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची जोरदार तयारी
वरोरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रामटेक येथे पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २३ फेब्रुवारी, शुक्रवारला पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम, वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख रितेश रहाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकारी रवाना होणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची विधानसभेत जोरदार तयारी सुरु आहे.
. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना नेते तथा पूर्व विदर्भ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या रामटेक येथील शिबिरात दिनांक २३ जानेवारी, शुक्रवारला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. यानंतर १० वाजता पहिले सत्र सुरु करण्यात येणार असून यामध्ये दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविक भाषणे होणार आहे. ११.३० ते १२ वाजता सहकारातून संघटन या विषयावर सहकार तज्ञ् प्रदीपकुमार खोपडे मार्गदर्शन करणार आहे. १२ ते १ वाजता मोदी सरकार शेतकऱ्यांचे शत्रू या विषयावर शेतकरी आंदोलक आणि जेष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे मार्गदर्शन करणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता दुसरे सत्र सुरु होणार असून यामध्ये प्रास्ताविक भाषणे व २.३० वाजता निवडणूक विजयाचे तंत्र आणि मंत्र या पुणे येथील विषयावर निवडणूक रणनीती तज्ञ् वैभव वाघ मार्गदर्शन करणार आहे. यानंतर ३.३० वाजता पदाधिकारी मुक्त संवाद होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्कर जाधव पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आहे. जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि वरोरा – भद्रावती विधानसभा संपर्क प्रमुख रितेश राहटे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सर्व शिवसेना पदाधिकारी रामटेक येथील शिबिरात रवाना होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून दिली आहे.


