Home सामाजिक सरस्वती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

सरस्वती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

1152

नागभीड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

.          कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्या व सहाय्यक शिक्षिका किरण गजपुरे, सहा.शिक्षक आशिष गोंडाने, पराग भानारकर, सतीश जिवतोडे, सहा.शिक्षिका पूजा वीर, मेघा राऊत, श्रद्धा वाढई यांची उपस्थिती होती.

.          या प्रसंगी अनेक विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत सदर कार्यक्रमाला उपस्थित होत्या तर इयत्ता तिसरी चा विद्यार्थी श्लोक बागडे हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. इयत्ता तिसरी, पाचवी व सहावी च्या विद्यार्थ्यांनी विविध गीतातून व सहा.शिक्षिका आशा राजूरकर यांनी स्फूर्ती गीताच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.. तर अध्यक्षीय भाषणातून पानसे यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारून आपल्या कृतीतून ते उतरवायला पाहिजे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका आशा राजूरकर यांनी केले तर आभार आशिष गोंडाने यांनी मानले. या नंतर नागभीड शहारातून प्रचंड मोठ्या जयघोषात सर्व विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांनी भगवी झेंडी दाखवत रॅलीचा शुभारंभ केला.

error: Content is protected !!