चंद्रपूर : आम्ही वारस विचारांचे, वर्तन आमचे परिवर्तनाचे हे ब्रीदवाक्य घेऊन अवघ्या एक महिन्यापूर्वी निर्माण केलेल्या समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना व अण्णाभाऊ साठे विचार मंचच्या संयुक्त विद्यमाने कन्यका सभागृह, गोंडपिपरी येथे भव्य दिव्य स्वरुपात शिवजयंतीचा साजरी करण्यात आली.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर प्रल्हाद नगराळे तर उद्घाटक म्हणून गोंडपिपरीचे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्रसिंग चंदेल, स्वागताध्यक्ष .लक्ष्मण मोहुर्ले हे होते.याप्रसंगी नन्नावरे,संदीप पोवरकर, काशिनाथ देवगडे, प्रा. हरिश्चंद्र नक्कलवार, विजय देवतळे, अॅडव्होकेट फुलझेले , कांबळे , दिगांबर लाटेलवार व समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचे राज्याध्यक्ष रुपेश वालकोंडे, बबन गोरंतवार यांनी एक समाज एक संघटना ही संकल्पना घेऊन मौलिक मार्गदर्शन केले.
. यामध्ये सुरुवातीला बुद्ध, शिवाजी, फुले, भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती करण्यात आली.त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व शेवटी समाज प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कलगट्टीवार यांनी केले. सूत्रसंचालन धम्मराव तानादू यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेखर बोनगीरवार यांनी केले. कार्यक्रमाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य स्त्री-पुरुष व युवक-युवती उपस्थित होते.


