नेरी : नेरी वरून जवळ असलेल्या सावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 19 फरवरी ला सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाची तसेच परिसराची स्वछता करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून माल्यार्पण करून महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला या प्रसंगी सरपंच शितल धारणे, उपसरपंच अजय पराते, देविदास गिरडे, मनोहर धापटे, भाग्यश्री कोरांगे , विद्याबाई बारचन्ने , ग्रा प सर्व सद्स गावातील नागरिक आणि ग्राम पंचायत कर्मचारी सुरज श्रीरामे व देवानंद कुमरे पाणी पुरवठा कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती..


