भद्रावती : यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून झाली.
. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी प्रा. डॉ सुधीर मोते, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी “छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार कृतीत उतरवण्याची आज समाजाला आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन केले”. तर डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मार्गदर्शन करताना ” छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राज्याची स्थापना करत असताना सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेतले” असे सांगितले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राकेश आवारी यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रवी देऊरकर, अशोक पिदुरकर, कवडू पोलेवार यांनी परिश्रम घेतले.


