Home सामाजिक लोक विद्यालय गांगलवाडी येथे शिवजयंती थाटात संपन्न

लोक विद्यालय गांगलवाडी येथे शिवजयंती थाटात संपन्न

1132

ब्रम्हपुरी : दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी गांगलवाडी संचालित लोक विद्यालय गांगलवाडी येथे  छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती साजरी करण्यात आली.

.        कार्यक्रमाचे प्रमुख स्थानी विद्यालयाचे प्रभारी प्रकाश बुरांडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक तुलसीदास मोहृले हे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित आधुनिक पोवाडा गाऊन शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा दिला. आपले प्रमुख स्थानावरून बुराडे यांनी शिवाजी महाराज वाचता वाचता तो वेचता यावा व खरा शिवबा जिथे पोहोचला नाही तिथे पोहोचता यावा कारण शिवाजी हे केवळ इतिहास नसून तो भविष्यही व्हावा, असे मत प्रतिपादित केले; तर प्रमुख अतिथी म्हणून मोहरले यांनी शिवबा बघता बघता, जगताही यावा व प्रजेने बावळे न होता मावळे व्हावे असे मत प्रदर्शित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंटू धोटे यांनी तर आभार प्रदर्शन पद्माकर रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!