Home चंद्रपुर जिल्हा विशेष नंदोरी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नंदोरी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

1418

आत्महत्येचे कारण अस्पस्ट

भद्रावती : तालुक्यातील नंदोरी बु येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुरज पुरुषोत्तम चामाटे (30) असे युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

.         भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील पुरुषोत्तम चामाटे व त्यांची पत्नी रविवारी सकाळी नारंडा येथे राहत असलेल्या त्यांच्या मोठ्या मुलाच्या मुलाचे नामकरणा साठी गेले होते. गावात शिवजयंती कार्यक्रम असल्याने त्यांचा लहान मुलगा सुरज पुरुषोत्तम चामाटे हा गावातच होता. नारंडा येथून नातवंडाचे नामकरण कार्यक्रम आटोपून सायंकाळी 7 वाजता च्या दरम्यान सुरज चे आई – वडील घरी आले. असता सुरज ने दोरीच्या सहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.

.         ते दृश्य पाहून आईने त्यांनी हंबरडा फोडल्याने गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. गावकऱ्यांनी तात्काळ वरोरा पोलिसांना माहिती देताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुरज चा मृतदेह खाली उतरवत खाजगी वाहनाने शवविच्चेदना करिता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकारणी पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!