किसान युवा क्रांती संघटनेचे तहसिलदार यांना निवेदन
भद्रावती
. नुकत्याच झालेल्या गारपीठ व अवकाळी पावसाने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले . त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. येत्या 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करायची आहे त्यामुळे शेतकरी बांधवाला हा झालेल्या गारपीटासहित पाऊस आत्महत्या करण्यात प्रवृत्त करणारा असल्या मुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करून सन 2023-24 चे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन किसान युवा क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र गेजिक यांच्या नेतृत्वात तहसिलदार भद्रावती यांना देण्यात आले आहे .
. मौजा कोकेवाडा .काटवल (भ ) पारोधी तसेच भद्रावती तालुक्यातील विविध भागात गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात शेतकऱ्यांच्या अनेक रब्बी हंगामातील पिकांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याकरिता किसान युवा क्रांती संघटना भद्रावती मार्फत दिनांक 12 फेब्रुवारी तहसिलदार भद्रावती यांना निवेदन देण्यात आले यावेळी रविंद्र गेजिक ,सामाजिक कार्यकर्ता विनोद बोबडे ,आष्टी चे सरपंच गोविंदा कुलमेथे ,विकास गजभे, रोशन मानकर ,भारत बेलेकर, अमित झाड़े ,चेतन भोसकर , वैभव ढोक ,संदीप गराते , वैभव खोड़े ,केशव मानकर ,मारोती खोडे आदी शेतकरी उपस्थित होते


