Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपुरात अवैध देशी दारूच्या ८० पेट्या पकडल्या

बल्लारपुरात अवैध देशी दारूच्या ८० पेट्या पकडल्या

1192

बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई

९ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

विसापूर : बल्लारपूर शहराची ओळख औद्योगिक शहर म्हणून आहे. येथील एका ठिकाणी अवैध देशी दारूचा साठा वाहनातून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी सापळा करून वाहन अडवले. तेव्हा वाहन चालकाने धूम ठोकून पळ काढला.पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात जवळपास ८0 देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. ही मोठी कारवाई बल्लारपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता दरम्यान न्यू कॅलोनी मार्गांवर कन्नमवार वार्डात केली. याप्रकरणी पोलिसांनी वाहनासह तब्बल ९ लाख ८0 हजार रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला. यामुळे शहरात अवैध्यरित्या दारू विक्रेत्यांचे धाबे दणानले आहे.

.           चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी दारू बंद होती.मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर रीतसर दारू दुकाने चालू झाले.तरीही दारू बंदी काळात ज्या अवैध दारू विक्रेत्यांनी बस्तान बसविले.त्यांनी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरु ठेवला. याच प्रकारातून अवैध दारू साठा शहरात येत असताना पोलिसांनी पकडून जप्त केला. टाटा एस.वाहन क्रमांक एम.एच.33/ टी. 4673 ने ८0 देशी दारूच्या पेट्या आणल्या जात होत्या.याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून वाहन अडविले.मात्र प्रसंवाधान ठेऊन चालकाने पळ काढला.

.           पोलिसांनी वाहन पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली. त्यावेळी तब्बल ८0 देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण तळी, उपनिरीक्षक हुसेन शाह, गोविंद चाटे, गजानन डोईफोडे, पोलीस कर्मचारी रणविजय ठाकूर, विशिष्ठ रंगारी, श्रीनिवास वाभिटकर, बाबा नैताम यांच्या पथकाने केली. याप्रकरणी अधिक तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!