आमदार बंटी भांगडिया यांचे कडून स्वागत
नागभीड : येथील ढीवर समाजाचे अध्यक्ष,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी संचालक व साईकृपा पतसंस्थेचे विद्यमान संचालक गुलाबराव भानारकर यांनी समाजासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत दरवर्षी आयोजित होणाऱ्या भोई गौरव मासिकाच्या पाचव्या वर्धापन दिनी 28 जानेवारी ला नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात “भोई गौरव सन्मान” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्याने चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया हे नागभीड दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते गुलाबराव भानारकर यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.
. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संतोष रडके, विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, बाजार समिती सभापती आवेश पठाण, वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार, भाजपा नेते जहांगीर कुरेशी, चिमूर तालुकाध्यक्ष राजू झाडे, भाजपा नेते रमेश ठाकरे, जेष्ठ नेते रमेश काळे, धनराज काटेखाये, माजी नगरसेवक संजय अमृतकर, बंडू गेडाम, रामदास बहेकर, विनय शेंडे, दिनेश समर्थ, शुभम चिल्लुरे, प्रविण गिरीपुंजे, मोजेश मरकाम, प्रफुल लांबट, शुभम येरणे, विजय संदोकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


