Home चंद्रपुर जिल्हा विशेष सकल ओबीसी बांधवांनी केली मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी

सकल ओबीसी बांधवांनी केली मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी

1342

मुल : शासनाने नुकताच मराठ्यांच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेला मसूद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात हरकती नोंद व मसुद्याची होळी करण्यासाठी मुल येथे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांचे नेतृत्वात सकल ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा काढून अध्यादेश त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी असंख्य ओबीसी समाज बांधव व महिलांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

.        यावेळी निवेदन देताना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, माजी जी.प. सदस्य प्रा.रामभाऊ महादोरे, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, राकाचे तालुका अध्यक्ष प्रा. किसान वासाडे, डॉ.पद्माकर लेनगुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, प्रा.सुधीर नगोषे, ईश्वर लोनबले, राकेश मोहूर्ले, कैलाश चलाख, सीमा लोनबले,अमित राऊत,शमलता बेलसरे,समता बनसोड, यांचेसह समता परिषदेचे समस्त पदाधिकारी, शेकडो महिला युवक ओबीसी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!