मुल तालुक्यातील प्रकार
शेतकर्यांची पोलीसात तक्रार
मूल : बीएमसी सोशल वेल्फेअर सोसायटी नागपूरच्या कंपनीच्या वतीने सेंद्रिय शेती करण्यासाठी गट निर्माण करून त्या आधारे शेती विषयक साहित्य उपलब्ध करून देणार असल्याची बतावणी करून बनावट प्रकल्प अधिकार्याने अनेक शेतकर्यांना लाखो रुपयाला चुना लावल्याचा प्रकार मुल तालुक्यात उघडकीस आला असून त्या तोतया प्रकल्प अधिकार्या विरुद्ध शेतकर्यांनी मुल पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
. बदलत्या काळानुसार सामान्य शेतकरी सुद्धा नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याच्या या प्रयोगशीलतेचा फायदा काही कंपन्या घेताना दिसत आहेत. केंद्र सरकार सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देत असल्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतांना दिसत आहे. पण त्याच्या या प्रयोगशील शेतीचा फायदा उठवत बीएमसी सोशल वेल्फेअर सोसायटी नागपूरचे प्रकल्प अधिकारी असल्याचे सांगत अमित बांबोडे या तोतया अधिकार्याने मुल तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये पंधरा लोकांचा सेंद्रिय शेती करण्यासाठी समूह गट बनवायचा सांगून प्रत्येकी तीनशे रुपये आणि गटप्रमुखांकडून तीन हजार रुपये याप्रमाणे पैसे उखडले. तसेच शेतकऱ्यांना काटेरी तार, विहीर, बोरवेल, शेततळे मच्छी खड्डा, स्प्रिंकलर, शेडनेट यासारख्या योजना वैयक्तिक सुरुवात पाहिजे असल्यास वैयक्तिक लाभाचे पैसे जमा करावे लागेल असे सांगत बऱ्याच लोकांकडून 3 ते 6 हजार पर्यंत शेतकर्या कडून पैसे जमा केले . बरेच दिवस लोटल्यानंतरही शेतकऱ्यांना योजनाचा फायदा मिळाला नाही.
. त्यामुळे शेतकर्यांनी बीएमसी सोशल वेल्फेअर सोसायटी नागपूर या कंपनीच्या अमित बांबोडे यांच्या बद्दल माहिती काढणे सुरू केले. मात्र या नावाचा अधिकारीच नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे निर्दशनात आले. याबाबत काही शेतकर्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार याचेशी संपर्क साधला. मंगेश पोटवार यांनी या गंभीर विषयाची दखल घेत तात्काळ मुलं पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी याचेशी सर्पक साधत त्या तोतया प्रकल्प अधिकारी अमित बाबोळे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
. यावेळी फसवणूक झालेले महिला पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्याना खोटे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या या टोळीचा शोध तात्काळ घेऊन कडक कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केली आहे.